चार नाणीं
चार नाणीं
जिंदगीभर काम करून थकून गेलेली एक म्हातारी आज भीक मागत होती.....
पण आज तिचे दुःख विकत घ्यायला माझ्याकडे चिल्लर कमी पडत होती....
मागुण मागून फक्त लोखंडाचे चार तुकडे मागत होती....
पण त्याच तुकड्यांनि चार दिवसाच उपाशी पोट भरायची पाळी माझ्यावरच होती....
नवी कोरी वा फटी पुराणी नोट हुडकत हाथ हळूच किसे चाचपडत होते....
नंतर लक्षात आलं दशकी रुपये आपल्या नशिबिच नव्हते.....
काय करावं ह्या नशिबाला...कफल्लक जीवनाच्या काळ्या पाण्याला....
होतो मी एकटाच मोकळ्या किस्याचा मातम मनवायला....
वाटलं होतं चार पैसे तिला देऊ ...आठ पैस्याच दुःख विकत घेऊ..
नि बारा पैस्याच सुख अनभवू.....
मग केलाच निर्धार ....
सरळ हाथ गेला किश्यात....
काढली चार नाणी
दोन तिला दिली, दोन आपल्यापाशी ठेवली...
आनंदून गेली ती म्हातारी, भरभरून आशीर्वाद देऊन निघून गेली...
अर्धपोटी जीव आन सजीव मन घेऊन मी रात्र कशीबशी काढली...
अचानक हाथ गेला किश्यात आणि पाहतो तरी काय चार नाणी आणखी तशीच होती...
निसर्गराजा
One of the best from you
ReplyDeleteOne of the best from you ...
ReplyDelete💯👌👌
ReplyDelete