औषध
औषध
पडत होती, झुरत होती,
पडत होती, झुरत होती,
क्षणाक्षणाला मरत होती,
पण तसुभरही घाबरत नव्हती....
लहानपणीच कडवट पचवायला शिकली,
पस्तिस रुपयाच्या चपलीने मरणअंतर कापायला शिकली,
कष्टाने निगरगट्ट झालेल्या
माईच्या हातात हात घालुन झगडायला शिकली,
'बाप' नावाच्या वांझ लाकडाचं ओझं निपचित सोसु लागली,
सोसताना त्रास व्हायचा,
रगत गळायचं, अश्रुचं ओझं ऊचंबळून बाहेर पडायचं,
कोणाला सांगायचं, कोणाला बोलायचं,
चिघळलेल्या जखमेवर ऊगाचच मीठ का उगळायचं,
क्षणाक्षणाला मरायचं पण तसुभरही नाय घाबरायचं..
शंभर रुपयाच्या कपड्याने अंग झापायचं,
पस्तिस चं खेटर आन्
दोन पैशाच्या रबरानं बाईचं बाईपण सावरायचं..
भाकरीचं पीठ भेटणं मुश्किल असायचं,
मग तोंडाला फासायचं पावडर ऊगाचच का घ्यायचं..
लाल रक्तानं सारं अंग भिजलेलं असायचं,
मेकअप करून का अश्रुचा खारट पाट दाखवत फिरायचं..
क्षणाक्षणाला मरायचं, पण तसुभरही नाय घाबरायचं...
पडत होती ती, झुरत होती ती,
माईच्या आधारानं पुन्हा सावरायची ती,
होतं कोण तिच्या जीवनात,
खायला भाकर न देणारी निष्ठुर नातेवाईक,
पदराआड हसनारे शेजारी....
कामसन्न बगळी डोळे,
पण ती नाय घाबरली,
जीवघेण्या दुनियेत माणसं जोडायला शिकली,
'राणी' भेटली देवाची 'श्रद्धा' भेटली,
कधीच न संपनार्या 'अपूर्व' प्रेमाची साथ भेटली,
रातराणीच्या 'प्रियकराची' साद भेटली,
दुःखाची दगडं फोडायला 'भीमाची' ताकद भेटली,
माणूसपण शिकवायला 'स्वामिची' दिशा भेटली...
आता येऊद्या कितीही वादळं,
होऊद्या वांझ लाकडाचे वार,
पलटुद्या जग सारं....
ही रणरागिनी आहे तयार....
आता नाही पडायचं,
ना झुरायचं,नाही मरायचं,
माईच्या अंगावर झालेल्या जखमेचं औषध मात्र बनायचं......
[.. निसर्गराजा]
Comments
Post a Comment